भांडण बघितल्याचा राग; कटरने चेहर्‍यावर वार

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) ः गल्लीत चाललेले भांडण बघितल्याचा राग येऊन एकावर कटरने हल्ला केल्याची घटना सातारा गाव परिसरात घडली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष जीजाभाऊ मनोहर रा. सातारा गाव साईनगर गल्ली नं. १ असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी योगेश सोमनाथ हिवाळे यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार ३ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गल्लीत झालेले भांडण का बघीतले या कारणावरून आरोपीने फिर्यादींवर कटरने हल्ला चढवला. 
ओठावर कटरने मारून जखमी केले. फिर्यादींचे दाजी भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांच्याही डाव्या हाताच्या बोटाला   कटर लागून जखमी झाले. पुढील तपास सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह जाधव हे करीत आहेत.